Sunday, February 24, 2019

वाईस अँड अदरवाइज लेखिका- सुधा मूर्ती



वाईस अँड अदरवाइज
लेखिका- सुधा मूर्तीमराठी अनुवाद लीना सोहोनी )


 या जगामध्ये खुप मोठ्या व्यक्ती आहेत.मोठ्या म्हणजे यशस्वी बर का. या यशस्वी व्यक्तीची श्रीमंती त्यांची life style त्यांचा झगमगाट या सर्व गोष्टी आपणाला दिसतात. पण या व्यक्तीचे कष्ट त्यांना आलेले अनुभव. त्या चांगल्या वाईट अनुभवातुन ते काहींना काही शिकत मोठे झाले. ते म्हणतात ना अनुभव हा माणसाचा खरा गुरु असतो. तसेच या यशस्वी लोकांचा खरा गुरु हा त्यांना आलेला अनुभव असतो. यशस्वी व्यक्ती त्यांना आलेल्या अनुभवातुन तर ते शिकतातच पण त्यांच्या जीवन प्रवासा  मध्ये भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्तीनं कडुन हि काहींना काही ते शिकत असतात. आज मी असेच एक पुस्तक घेऊन आलो आहे.
कॉम्पुटर सायन्स मध्ये एम.टेक केलेल्या आणि पुण्यातील टेल्को कंपनी मध्ये पहिल्या स्री अभियंता म्हणुन निवडल्या गेलेल्या अत्यंत हुशार आणि मनाने,विचाराने आणि रहाणीमानाने ही अत्यंत साध्या असणाऱ्या,प्रत्येक तरुण-तरुणीच्या प्रेरणा स्थानी असणाऱ्या अशा आदरणीय  सुधा मूर्ती.
सुधा मुर्ती या इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा. भारताच्या आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागास भागामध्ये त्यांनी भटकंती केली. या भागात अठरा विश्व्ये दारिद्रयात राहणाऱ्या माणसांच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा पोहचवण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना कधी अत्यंत गरीब लोक भेटले तर कधी धूर्त राजकारणी यातुन आलेले अनुभव आणि त्यांना भेटलेली माणसे. यातुन समजलेला मनुष्यस्वभाव.वाईस अँड अदरवाइज या पुस्तकातुन त्यांनी मांडला आहे.
सुधा मुर्ती यांनी परतफेडीची अपेक्षा न करता न ठेवता अनेकांना  मदत केली. काहींनी त्या मदती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर काहींनी मिळालेल्या मदतीचा उल्लेखही केला नाही. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना खुप लहान-मोठी माणसे भेटली त्या प्रत्येकाकडुन बरंच काही त्यांना शिकायला मिळाले. २०६ पानाच्या या पुस्तकामध्ये सुमारे २६ कथा आहेत.प्रत्येक कथेमधुन सुधा मुर्ती यांच्या कार्याची आणि त्यांच्या जीवनाविषयीच तत्वज्ञान या पुस्तकाच्या माध्यमातुन दिसुन येते.
खरंच मित्रहो आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचायचं असेल तर आपल्याला अनुभवातुन शिकलं पाहिजेल. जीवनामध्ये येणारे बरे वाईट चढ उतार सकारात्मकरीत्या पार केले तर च आपण  यशाचे उंच शिखर पार करू शकतो. जसे आदरणीय सुधा मुर्ती.
पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी केले आहे. या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद लीना सोहनी यांनी उत्कृष्ट प्रकारे केले आहे. २०६ पानाचे पुस्तक वाचुन कधी पुर्ण होते हे समजत नाही.आदरणीय सुधा मुर्ती यांच्या विशाल कार्याचा आढावा या पुस्तकामधुन होतो. हे पुस्तक वाचल्यावर समजत कि माणसाचा खरा गुरु हा त्याला आलेले अनुभव होय. जो अनुभवातुन शिकतो तो सदैव यशस्वी होत रहातो.

श्रीजीवन तोंदले

www.pustakexpress.com