फेसाटी
नवनाथगोरे.
काही लोक अशी असतात की त्यांच्या दिसण्या-वागण्या वरून अगदी त्यांच्या रहाणीमान आणि पोषाखा वरून ते कोण आहेत हे आपल्याला समजत नसत.आजच्या काळामध्ये आपण माणसं एखाद्या व्यक्तीच्या पोषाखा वरून त्याच्या रहाणीमाना वरून त्याच्या विषयी आपल मत लगेच बनवुन बसतो आणि असच काही माझ्या विषयी झालं. मी अश्याच एका व्यक्तीला भेटलो. ती व्यक्ती रहाणीमानाने एकदम साधी त्या व्यक्तीकडे या आधुनिक जगातलं काही असेल तर तो त्यांचा मोबाईल. कष्ट आणि संघर्ष यातून स्वतःला सिद्ध करून उभारणारी ती व्यक्ती म्हणजे लेखक नवनाथ गोरे.लेखक गोरे यांच्याशी एका कार्यक्रमाच्या निमित्य भेट झाली.अत्यंत साधा माणूस, कपडेही साधे, भाषा पश्चिम महाराष्ट्राकडचीच; अहो एवढंच काय मी त्यांच्या पुस्तकांवर त्याची सही घेण्यासाठी गेलो तर ती हि साधी. उगाच लांब लचक भारी वगैरे असं काही नाही. त्यांचा सही करण्याच साधे पण म्हणजे सही करून त्या खाली त्या दिवशीची तारीख सुद्धा लिहिली.

कादंबरीचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे.
एक मेंढपाळ त्याच्या शेळ्यांसोबत दूरवरच्या घराकडे बघत उभा आहे. त्याच्या कपड्या
वरून त्याचे कष्टी जीवनाचा अंदाज येतो डोक्यावरच आभाळ निळे आणि शांत आहे.
आजूबाजूला लांबवर पसरलेले मोकळं शांत रान आहे. जणू त्या रानावर पाण्याचा टिपूस सुद्धा नाही
आहे.
लेखक नवनाथ गोरे यांच्या जन्मापासून ते त्यांच्या M.A शिक्षणा पर्यंतचा प्रवास या कादंबरी मध्ये दिला आहे. घरी अठराविश्वे दारिद्रय,उपासमार यासोबतच लेखकाच्या आई वडिलांची तीव्र इच्छा असती कि त्यांच्या मुलाने नाथाने शिक्षण घ्यावे. या दलदलीच्या आयुष्यातून बाहेर काढावे.लेखक गोरे यांना शिक्षणाचे ओढ नव्हती. घरी उपासमार तर होतीच त्यासोबतच देणेकऱ्यांचे दुष्टचक्र घराच्या अवतीभोवती होते.गाय घेण्यासाठी घेतलेले सहा हजाराचे कर्ज ते हळूहळू दिड लाखावर जाते. ते कर्ज फेडण्यासाठी जमीन विकावी लागती,तरी ते कर्ज काही फिटत नाही आणि घरच्या भोवतीचे कर्जाचे दुष्टचक्र फिरतच रहाते.

लेखकाची मोठी
बहीण हिराबाई हीचा
सासुरवासाने झालेला दुर्दैवी अंत आणि त्यासोबतच लेखकाच्या घरावर आलेली दुःखाची कळा
हे सर्व वाचत असताना मनाला तीव्र वेदना होतात. लेखकाच्या घरावर एकामागुन एक संकट
येतच असतात आणि त्यासोबत लेखकाला होणारे एकामागोमाग एक आजार.सदैव राबणारे
लेखकाचे आईवडील,कधी कधी लेखकाच्या आईला कोरभर भाकर सुद्धा खायला
मिळायची नाही. स्वतः उपाशी राहून मुलांच्या पोटाला खाऊ
घालण्याची त्या माऊलीची धडपड वाचली की मन हळहळते.
लेखकाचा हा प्रवास वाचत असताना पुस्तकांमधील एक गोष्ट मनाला
स्पर्शून जाते. ती म्हणजे संगतगुण, लेखकाचा लहानपणीचा मित्र दगड्या याच्या संगतीत राहून लेखकाला
गुटखा,तंबाकू खाण्याचे,दारू पिण्याचे व्यसन जडते. हे व्यसन इतके जडते कि खुद्द लेखक
त्याच्या बारावीच्या इंग्रजीच्या पेपरला दारू पिऊन जातो. आणि दुसऱ्या बाजूला
लेखकाचे मित्र बापू,विष्णू,संतोष,दिलीप,राजू हे लेखकाला जतला आपल्या रूम वर घेऊन येतात आणि
जतमध्ये इंग्रजीच्या क्लासला ऍडमिशन घेऊन देतात आणि बारावीचा राहिलेला इंग्रजीचा
विषय सोडविण्यासाठी मदत करतात.लेखकाच्या जतमधल्या प्रवासात एक वेगळीच घटना घडते. ती वाचली की मन हळहळते.
लेखकाचा हा सगळं खडतर प्रवास वाचताना मनाला अत्यंत वेदना होतात. लेखकाचा हा सर्व संघर्षमयी प्रवास वाचताना आणि शहरी जीवनात राहत असताना इथल्या सुखसोयीचा उपभोग घेत असताना खेड्यातील संघर्षमय जीवनाचा हेवा वाटतो. फेसाटी या कादंबरीतून लेखक नवनाथ गोरे यांचा संघर्षमय आयुष्यातून एक वेगळीच प्रेरणा मिळते. प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक जरूर असलं पाहिजेल. प्रत्येकाने जरूर वाचावी अशी कादंबरी लेखक नवनाथ गोरे लिखित "फेसाटी.
"फेसाटी याचा अर्थ म्हणजे त्रास,वेदना,दुःख असा जत तालुक्यात घेतला जातो. आणि प्रदेशानुसार बोली भाषा बदलते. प्रत्येक प्रदेशानुसार त्याचा अर्थही बदलतो". हा अर्थ मला खुद्द या कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी सांगितला आहे. आणि तो मी येथे तुमच्या समोर मांडला

-
श्रीजीवन तोंदले.