एकोणिसावी जात
लेखक - महादेव मोरे
आपल्या सामाज्यामध्ये अठरापगड जाती आहेत.त्याचे वेगळे त्या त्या
जातीतील लोकांनी टिकवून ठेवले आहे. प्रत्येकाचे वेगळेपण ही त्यांची ओळख
आहे. यातूनच त्यांचं वैविध्यपूर्ण आयुष्य घडत आहे.
पण आज एक पुस्तक वाचतेवेळी या अठरापगड
जातींच्या पलीकडे जाऊन स्वतःचे असे वेगळेपण सांगणारी एक जात आपल्याला दिसून येते.
भिकासत्यवाणी आयुष्य जगणारी, काम करणारी, सतत भटकंतीवर असणारी, मिळेलते जेवणारी, मिळेलत्या जागेवर पस्तारी हातरून
झोपणारी अशी ही जात म्हणजे ड्रायव्हर-क्लिनर लोकांची.
मी बोलत आहे, ग्रामीण कथा आणि कादंबरीकर महादेव मोरे
लिखित कादंबरी "एकोणिसावी जात" या विषयी.
लेखक महादेव मोरे हे
महाराष्ट्र-कर्नाटक सीमे रेषेवरील निपाणी या गावचे. महादेव मोरे त्यांच्या
लिखाणातून ट्रक ड्रायव्हर,
क्लिनर, गॅरेजमध्ये काम करणारे लोक, हॉटेलवाले, शेत मजूर या सारख्या गोष्टीतून
उभारनिर्वाह करणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकतात.
अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले महादेव
मोरे यांनी कधी गॅरेजमध्ये,
तर कधी ड्रायव्हर म्हणून काम केले
होते. त्याच अनुभवातून एकोणिसावी जात ही कादंबरी लिहिली आहे. पिठाची गिरण
चालवत त्यांनी ३८ पुस्तकं लिहिली. त्यांच्या प्रत्येक पुस्तकाच्या माध्यमातून ते
समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकतात.
दिनांक २१ ऑगष्ट २०२४ रोजी त्यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. मोरे यांनी
विपुल असं साहित्य लेखन केले आहे.
१५८ पानांच्या या कादंबरीमधील घटनांचा
आणि त्यामधील तपशिलांचा कालखंड हा ४०-५० वर्षां पूर्वीचा आहे. कादंबरीचा नायक
नारायण, हा लहानपणापासून आईवडिलांचं छत्र
हरवलेला. गावच्या स्टॅंडवर फळ विक्रेत्या चाचाच्या टपरीमध्ये तर कधी स्टॅन्डवरच्या
बंद गाड्यांमध्ये झोपून. कधी त्याच गाड्या धुणे, पुसणे, गाडयांना शॅइल (लुब्रिकेटिंग), पंक्चर काढलेली इन्नर टायरमध्ये बसवून स्टेपनी करणे, तर कधी त्याच गाडीवर क्लिन्नर म्हणून
काम करणे. अशा प्रकारच्या कामातून पैसे मिळवून
नारायण स्वतःचा रोजगार चालवत असे. यासोबतच नारायण ड्रायव्हरच्या शेजारी
असून तो क्लच कसा दाबतो, गियर कसा टाकतो या गोष्टी बारकाईने बघून, तो गाडी चालवायला शिकतो.
पुढे हा नारायण गाड्यांवर ड्रायव्हरची
नोकरी करत करत हायवे लाईनवर चालणाऱ्या ट्रॅकवर ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळतो. या
त्याच्या प्रवासात त्याला बरे-वाईट अनुभव येतात.
त्यातून तो मार्ग काढत त्याचे आयुष्य
चालवत असतो. कादंबरीचे पूर्ण कथन जरी नारायण भोवती
फिरत असले तरी, लेखक महादेव मोरे यांनी ड्रायव्हर लाईन
मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमे रेषेवरील
निपाणी या गावचे लेखक महादेव मोरे यांनी याच भागातील संपूर्ण ग्रामीण जीवनाचे
दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना घडवले आहे.
नारायण जरी फक्त एक ड्रायव्हर म्हणून
असला तरी त्याच्या आयुष्यातील येणारे अनुभव वाचकांना आपलेसे वाटू शकतात.
ड्रायविंगच काम करत करत नारायणाच्या
आयुष्यामध्ये यास्मिनच्या रूपाने प्रेमाचे क्षण सुद्धा येतात. ते क्षण लेखकाने
त्यांच्या चित्रदर्शी शैलीमध्ये मांडले आहेत ते अक्षरशःकाळजाला भिडतात. कथेच्या
सरते शेवटी नारायणाच्या आयुष्यात एक मोठे वादळ येते त्याने तो हादरून जातो. पण
त्याला सावरण्यासाठी त्याच्या या ड्रायव्हर लाईन मधील त्याचे मित्र त्याला मदत
करतात.
ग्रामीण जीवनाचे वेगळ्या पद्धतीने
अनुभव देणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे, मेहता पब्लिशन यांनी केले आहे. पुस्तकाची कथा आणि वाचनकांना
पुस्तकाकडे आकर्षित करणारे मुखपृष्ठ साकारले आहे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी.
अठरापगड जातींच्या पंक्तीत मोटार लाईनमधील माणसांच्या या आगळ्यावेगळ्या एकोणिसाव्या
जातीच्या जगाचे वेगळे विश्व लेखकाने वाचकांसमोर उभे केले आहे. या धगधगीत
जीवनानुभवाचे चित्रण वाचकांना या कादंबरीकडे आकर्षित करणारे आहे. प्रत्येक वाचकाने
वाचावी आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही ही कादंबरी जरून असली पाहिजे. अत्यंत साधं
आयुष्य जगलेले, ग्रामीण कथा आणि कादंबरीकर महादेव मोरे
लिखित कादंबरी एकोणिसावी जात !
No comments:
Post a Comment
धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.