एक पाय जमिनीवर
लेखिका - शांता गोखले
भाषांतर - करुणा गोखले
आता पर्यंत खुप आत्मचरित्र वाचली. प्रत्येकाने त्यांच्या आयुष्याची जडणघडन कशी झाली, त्यांच्या आयुष्याचा प्रवास किती खडतर, आव्हानात्मक होता. चांगल्या वाईट परिस्थितीचा सामना करत ते त्यांच्या इच्छित ध्येया पर्यंत कसे पोहचले त्याबद्धल आपल्या आत्मचरित्रामध्ये ते मांडतात. पण यासर्व गोष्टींना छेद देत एका व्यक्तीने त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या शरीराच्या प्रत्येक अवयवांच्या वाढी पासून, ते कसे परिपक्व होते गेले आणि कसे कमी झाले या प्रवासाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याचा प्रवास त्यांनी वाचकांच्या समोर मांडला आहे. मी बोलत आहे लेखिका, अनुवादकर, नाट्यसमीक्षक शांता गोखले लिखित एक पाय जमिनीवर या त्यांच्या आत्मचरित्राविषयी. या पुस्तकाचे मराठी भाषांतर केलं आहे लेखिका करुणा गोखले यांनी.
लेखिका शांता गोखले या सर्वांना परिचयाच्या आहेत ते म्हणजे 'रिटा वेलींकर' आणि 'त्या वर्षी' या त्यांनी लिहिलेल्या कादंबरीच्या माध्यमातून.यासोबतच नाट्यसमीक्षक,अनुवाद्कार म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. पण जेव्हा या पुस्तकाच्या माध्यमातून मी शांता गोखले यांना समजून घेतले तो अनुभव विलक्षण आहे.पुस्तक वाचायला सुरु केल्यावर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय पुस्तक हातावेगळे करता येत नाही.
२८० पानांच्या पुस्तकामध्ये शांता गोखले यांनी त्यांच्या शरीराच्या माध्यमातून म्हणजेच जसं या पुस्तकाच्या शीर्षकाच्या माध्यमातून आपल्याला समजून येत की लेखिकेने त्यांच्या शरीराच्या भिंगातून त्यांच्या आयुष्याचा पट उलघडला आहे. त्याच प्रमाणे या आत्मचरित्राच्या प्रकरणांची नावेसुद्धा नाक, दात, केस, मोतीबिंदू, मेंदू अशी आहेत. यासोबतच त्याच्या उपचारांची नावे सुद्धा नवीन आणि वेगळीच वाटावी अशीच. बालपण, शिक्षण, नोकरी, लिखाण, वैवाहिक आयुष्य, त्यानंतर वृध्दापकाळामध्ये आलेले आजार आणि व्याधी यासर्व गोष्टींचा उलघडा लेखिका करत आहेत. शांत गोखले यांचे शरीरभान हेच या पुस्तकाचे मुख्य निवेदक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मला एक गोष्ट समजून आली; ती म्हणजे माणसाचं आयुष्य त्याच्या शरीराच्या माध्यमातून अस्तित्वात असतं आणि ते अस्तित्व तो कधीच नाकारू शकत नाही. लेखिकेने त्यांच्या वैवाहिक आयुष्य बद्दल सखोलपणे चर्चा केली आहे.या आगळ्यावेगळ्या आत्मचरित्राविषयी खूप बोलावे आणि लिहावे तेवढे कमीच आहे, पण इथे थोडं थांबतो.
One Foot on the Ground A Life Told Through The Body या मूळ इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर करुणा गोखले यांनी उत्तम प्रकारे केले आहे. शांता गोखले यांचं अनुवादकार्य खूप मोठं आहे. त्यांच्याच आत्मचरित्राचे अनुवाद करणे हे खूप मोठं काम आहे, ते करतेवेळी दडपण येणे साहजिकच आहे व करुणा गोखले यांनी ते आव्हान खूपच चांगल्या प्रकारे पार पडले आहे. पुस्तक वाचतेवेळी कुठेच असा भास किंवा समजून येत नाही की आपण जे पुस्तक वाचत आहोत ते अनुवादित आहे. लेखनाची भाषा अत्यंत सोप्पी आहे त्यामुळे वाचनाची गोडी लागून राहते. पुस्तक वाचायला सुरु केल्यावर ते हातातून सुटत नाही याचं संपूर्ण श्रेय करुणा गोखले यांना जाते. प्रत्येक वाचकाने हे आगळेवेगळे आत्मचरित्र जरून वाचले पाहिजे आणि प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक जरूर असले पाहिजे. पुस्तकाचे प्रकाशन पपायरस प्रकाशन यांनी केले आहे.
खूप छान लिहिले आहे. तुमचे लिखाण नेहमी पुस्तक वाचण्याची प्रेरणा देते. नवीन पुस्तकांची माहिती मिळते. लिहित राहा .
ReplyDeleteछान लिहिले आहे. तुमचे लिखाण नेहमी पुस्तक वाचण्याची प्रेरणा देते. नवीन पुस्तकांची माहिती मिळते. लिहित राहा.
ReplyDeleteफारच छान. आवडेल वाचायला.
ReplyDelete