गोल्डा एक अशांत वादळ
लेखिका - वीणा गवाणकर.
हे पुस्तक अशा लोकांसाठी खास आहे ज्यांना जागतिक राजकारणामध्ये रुची आहे, ते समजून घेण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी हे पुस्तक एक पर्वणीच
ठरेल. हा प्रवास आहे एका सामान्य स्त्रीचा. एक सामान्य स्त्री ते धडाडीची कार्यकर्ती
आणि मग प्रत्येक अडचणींवर मात करत, राजकारणामध्ये दरमजल दर करत एक कणखर पंतप्रधान पर्यंतचा हा प्रवास
आहे. मी बोलत आहे लेखिका वीणा गवाणकर लिखित, इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान गोल्ड मेयर यांचं चरित्र "गोल्ड
एक अशांत वादळ....!"
३१३ पानांचे हे पुस्तक समजून
घेण्यासाठी आपल्याला या पुस्तकाची चार भागांमध्ये विभागणी केले पाहिजे.ती पुढील
प्रमाणे...
एक गोल्ड मेयर यांनी ज्या लोकांसाठी
संपूर्ण आयुष्य संघर्ष केला, त्या लोकांना स्वतःची जमीन, आपला देश मिळवा जिथे त्यांचे मूळ पुरुष होते.
ते लोक म्हणजे ज्यू. ह्या ज्यू लोकांचा
द्वेष का केला जात होता हे समजून घेतलं पाहिजे.
हा थोडा मोठा इतिहास आहे ज्यासाठी
आपल्या इ.स पूर्व काळामध्ये गेलं पाहिजे. वैभव संपन्न असणाऱ्या ज्यू सत्तेला
सालोमन राजा नंतर उतरती कळा लागली. रोमनांच्या अत्याचारामुळे ज्युना पलायन करावं
लागलं. जे ज्यू युरोपमध्ये गेले त्यातल्या एका कुटुंबामध्ये ‘येशू ख्रिस्त’
जन्माला आले.
येशू हे मूलतः ज्यू होते पण त्यांनी
रोमन एम्पायरमध्ये आपली वेगळी शिकवण द्यायला सुरुवात केली.
जसं गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माची
शिकवण दिली., आणि बौद्ध धर्माचा तिथून प्रसार झाला, तसंच येशू ख्रिस्त यांनी ख्रिश्चन
धर्माची शिकवण द्यायला सुरवात केली आणि तेथून ख्रिश्चन या धर्माचा प्रसार सुरू
झाला. येशू ख्रिस्ताच्या या शिकवणीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आणि ते
लोकप्रिय होऊ लागले. या कारणाने ज्यू राज्यकर्त्या लोकांनी
येशू ख्रिस्तांना मोठ्या जनसमुदायासमोर क्रॉसला लटकावून मारलं.
येशूच्या मारेकरी यागोष्टीमुळे ज्यू
लोकांविरुद्ध द्वेषाच्या वातावरणाला सुरुवात झाली. हे वातावरण इतके भयानक होते की
ज्यू लोकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जगभरामध्ये पलायन केले.
दुसरा भाग म्हणजे, पुढे जे ज्यू लोक संपूर्ण जगभरामध्ये
मुख्यतः युरोपमध्ये पसरले होते त्या लोकांना आपल्या मूळ देशाशी, मूळ जमिनीशी ओढ होती. ती तेव्हा अरब
देशांच्या ताब्यात होती. तेव्हा प्रत्येक ज्यू लोकांना आपल्या त्या देशामध्ये परत
जायचं होतं आणि इथून सुरवात होते ज्यू लोकांच्या अस्तित्वाच्या लढाईला ज्याला 'झायॉनिसीम' म्हणून ओळखलं जातं. या चळवळीचा एकच
हेतू होता तो म्हणजे ज्यू लोकांना आपला देश परत मिळावा. या चळवळीमध्ये पुढे गोल्डा
सहभागी झाली.
तिसरा भाग येतो, गोल्डा यांचा जन्म ३ मे १८९८ मध्ये
युक्रेन (रशिया) मधील केएव येथे झाला. रशियन लोकांकडून ज्यू लोकांवर होणारे
हल्ले गोल्डने तिच्या बालपणीच पाहिले होते. ते दृश्य तिच्या बालमनावर कायमच कोरलं
गेलं होतं. पुढे १९०६ मध्ये गोल्डाचा परिवार अमेरिकेत मिलवॉकीमध्ये आले.
तिथे गोल्डाचे वडील रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये
काम करत तर आईने एक छोटं किराणा दुकान सुरु केलं. गोल्डची मोठी बहीण शेयना ही
झायॉनवादी श्रमिक चळवळीमध्ये गुंतली होती आणि त्याचा प्रभाव छोट्या गोल्डावर पडला.
समाजवाद, झायॉनवाद्यांचे तत्वज्ञान तिला आवडे.
ज्यूंना स्वतःची राष्ट्रभूमी हवी हे
विचार तिच्या मनामध्ये रुजू लागले. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता
गोल्डने तिचे शिक्षण पूर्ण केले आणि झायॉनवादी श्रमिक चळवळीमध्ये सक्रिय होऊ
लागली. त्यासाठी निधी संकलन करणे, चर्चा सत्रांमध्ये भाग घेणे. आपल्या नव्या राष्ट्राच्या कल्पना
लोकांपर्यंत पोचवणे यासारखे काम ती करत असे.
तिच्यामधील उत्साह, चैतन्य, अस्खलित इंग्रजी, या गोष्टींच्या जोरावर तिचा जनसंपर्क खूप मोठा होता आणि हीच गोष्ट
पुढे राष्ट्र उभारणीसाठी उपयोगी पडली. यासोबतच ज्यू निर्वासितांच्या
प्रश्नांवर त्यांच्या स्थलांतरणासाठी ती नेहमी प्रयत्नशील असे.
चौथा भाग म्हणजे १४ मे १९४८ मध्ये
ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र उभारले ते म्हणजे 'इस्रायल'. या राष्ट्र उभारणीमध्ये ज्या मोठं
मोठ्या नेत्यांचा सहभाग होता त्यांच्या बरोबरीने गोल्डाचे योगदान तितकेच महत्वाचे
होते. पुढे मंत्रिमंडळामध्ये श्रम आणि रोजगार मंत्री, परराष्ट्रमंत्री ते पंतप्रधान. अत्यंत
कठीण काळामध्ये इस्रायलचे नेतृत्व, गोल्डाचा हा प्रवास वाचकांना प्रभावीत करतो.
वयाची सत्तरी उलटलेली गोल्डा इस्रायलची
पंतप्रधान झाली. सिरिमाओ बंदरनायके (श्रीलंका) इंदिरा गांधी (भारत) यांच्या नंतर
तिसरी स्त्री पंतप्रधान गोल्डा मेयर. गोल्डा यांना इस्रायलच्या
धाडसाचं-शक्तीचं-भक्तीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं.
राष्ट्र प्रेमाची प्रेरणा प्रत्येक
ज्यु लोकांच्या मनामध्ये निर्माण करणाऱ्या गोल्डा मेयर यांनी इस्रायल या ज्यु
राष्ट्राला सक्षम बनवण्यात आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले.
या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर
यांनी गोल्ड मेयर यांचा हा भारावून टाकणारा प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून
मांडला आहे. लेखिका वीणा गवाणकर यांनी गोल्डा मेयर यांचे चरित्र अशा पद्धतीने
मांडले आहे की
हे फक्त चरित्र न राहता ते एका गोष्टी
स्वरूपामध्ये उतरलं आहे, आणि इस्रायली पंतप्रधान होत्या तशा
वाचनाच्या माध्यमातून समोर येतात. या पुस्तकाचे प्रकाशन इंडस सोर्स बुक्स यांनी केले आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ
मनोज आचार्य यांनी केले आहे. जागतिक राजकारणामध्ये रुची असणाऱ्या प्रत्येकसाठी आणि
प्रत्येक वाचकाने जरूर वाचावे आणि प्रत्येकाच्या संग्रही असावी असे हे पुस्तक, लेखिका वीणा गवाणकर लिखित गोल्ड एक
अशांत वादळ.....!
No comments:
Post a Comment
धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.