Sunday, June 2, 2019

The Secrets We Keep लेखक - सुदीप नगरकर





लेखक  -  सुदीप नगरकर

आपल्या भूतकाळामध्ये आपल्या हातुन काही नकळत चुका होतात.किंवा आपल्या भुतकाळामधील आपण घेतलेले निर्णय हे पुढे भविष्यामध्ये किती चुकीचे आहेत आहे त्यामुळे आपल्या आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये त्याचा किती वाईट परिणाम होतो हे सांगता येत नाही. याच चुकीच्या निर्णयांनी वर्तमानामध्ये झालेला गोधळ पाहता मनामध्ये एकच विचार येतो की काय आपण आपला भुतकाळ मिटवु शकत असतो तर....? आणि त्यापासुन दुर जात येत असतं तर....? काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत. आणि ती शोधन पण वेर्थ असत.

 नमस्कार भरपुर दिवसांच्या सुट्टी नंतर आज तुमच्या भेटीला आलो आहे. ते पण एका मराठमोळ्या लेखकाचे इंग्रजी पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. तो मराठमोळा लेखक म्हणजे सुदीप नगरकर. पुस्तकाची भाषा जरी इंग्रजी असली तरी माझा ब्लॉग मराठी आहे. म्हणुन पुस्तकाचा परिचय हा मराठी मधुनच असेल.

लेखक सुदीप नगरकर यांची या आधीची दहा पुस्तके ही bestselling  ठरली आहेत.या सोबतच लेखक सुदीप नगरकर यांना celebrity Author of  2013 चा पुरस्कार Amazon India यांच्या कडुन मिळाला आहे. तसेच 2016  मध्ये Youth Icon of india  हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे. सुदीप नगरकर यांच्या लिखाणाची खासियत म्हणजे त्यांना आताच्या घडीला तरुणानं मध्ये कोणकोणत्या गोष्टी tranding मध्ये आहेत आणि समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींवर लक्ष आहे. आणि ते त्यांच्या लिखाणीमधून दिसुन येते. सुदीप नगरकर यांची नवीन आलेली कादंबरी the Secrets We Keep ही कादंबरी सुद्धा bestselling novel ठरत आहे. एखाद्या हिंदी चित्रपटापेक्षा सरस कथानक या पुस्तकाचे आहे.

कथेची सुरवात flashback ने होते.  कथेचा नायक राहुल हा IAN  म्हणजे intiligens संस्थे साठी काम करतो. याच्या भोवती या कथेचे कथानक फिरत आहे. निरव,करण,राशी,आकृती,राहुलचे आई-बाबा हे कॅरेक्टर्स सुद्धा ह्या कथेचे महत्वाचे भाग आहेत.  एका मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये असणारे वातावरण या कुटुंबामध्ये आहे.मोठ्या आणि लहान मुला मध्ये असणारी तुलना या कुटुंबामध्ये आहे. यामुळे राहुलला त्याच्या मोठ्या भावाकडून करण कडुन चांगल्या गोष्टी शिक असा सल्ला दरवेळी मिळे. राहुल जरी अभ्यासामध्ये कमी असला तरी तो खेळ मध्ये आणि शाळेतील इतर गोष्टींमध्ये सरस आहे. उदा.NCC. पण त्याच्या घरच्यांना ते पटत नाही. त्यांची इच्छा आपल्या दोन्ही मुलांनी अभ्यासामध्ये अव्वल असावे. याच दरम्यान राहुल एका मुलीच्या प्रेमात पडतो. त्रिशा ही राहुलच्या गणिताच्या शिकवणी मध्ये शिकणारी मुलगी. थोड्या काळासाठी का असेना या दोघांचे प्रेम बहरू लागते. या दोघांमधील प्रेमाचे क्षण लेखकाने अत्यंत हळुवार पणे मांडले आहेत. लेखक सुदीप नगरकर यांची ही एक वेगळी जमेची बाजू  आहे किंवा असे म्हणावे लागेल की लेखका कडे एक वेगळीच शक्ती आहे ज्याद्वारे प्रेमासारखा विषय तो अत्यंत हळुवार पणे मांडतो. प्रेमाचे गुलाबी क्षण मांडावे तर ते लेखक सुदीप नगरकर यांनीच. एका बाजुला  राहुल आणि त्रिशा यादोघांचे प्रेम सुरु असते आणि एका बाजुला राहुलच्या घरी असा एक प्रसंग घडतो ज्याने सर्व राणे कुटुंब हादरून जाते. त्याचा विपरीत परिणाम असा घडतो की राहुलला सर्वांच्या त्वेषाला सामोरी जावे लागते. या सर्वांवर चिडुन राहुल घर सोडुन पळून जातो. राहुलच्या या निर्णयाने त्याच्या सोबत बाकीच्या लोकांचे सुद्धा आयुष्य बदलुन जाते. राहुलचा हा निर्णय त्याला त्याच्या वर्तमानामध्ये एक मोठी किंमत चुकवायला भाग पडतो. आणि याठिकाणी पुस्तकाचा एक भाग संपतो.

कथेचा एक भाग काही वेगळा आणि कथेचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा सरस आणि हटके आहे. आणि हेच तर लेखकाचे वैशिष्ट्ये आहेत. पुस्तकाच्या प्रत्येक पानामध्ये उत्कंठता आहे. आता पुढे काय होणार अशी हुरहूर वाचकाच्या मनाला लागुन रहाते. कथेचा शेवट जेव्हा वाचकांसमोर येतो तेव्हा वाचक विचारात पडतो. कथेचा शेवट अत्यंत गोड आणि मजेदार आहे.

पुस्तकाचे प्रकाशन पेंगूइन रँडम हौस यांनी केले आहे. पुस्तकाची भाषा आणि वाक्य रचना अत्यंत सरळ आणि सोप्पी आहे. काही वाचकांना असे वाटेल की पुस्तकाची भाषा इंग्रजी आहे म्हणजे समजण्यास अवघड असेल. पण मी त्या सर्व वाचकांना म्हणजे जे अशे वाचक आहेत ज्यांना इंग्रजी पुस्तकं वाचावी असे वाटते  पण इंग्रजी भाषेला घाबरून ते यासारख्या पुस्तकांकडे पाठ फिरवतात. त्यासर्व वाचकांना मी सांगेन कि पुस्तकाची इंग्रजी भाषा ही अत्यंत समजण्यास सोपी आणि सुटसुटीत आहे. जशी आपल्या शाळेमधील इंग्रजी पुस्तकांची भाषा असते. अगदी तशीच. त्यामुळे कथा लगेच समजते आणि कथेच्या शेवटची हुरहुर लागुन रहाते.

कथेच्या दुसरऱ्या भागाविषयी मी या लेखात काही मांडले नाही आहे. तो भाग अत्यंत महत्वाचा आहे. तो जाणुन घेण्यासाठी लेखक सुदीप नगरकर लिखित the Secrets We keep हे पुस्तक वाचलेच पाहिजेल.



श्रीजीवन तोंदले
Pustkaexpress.com
  

4 comments:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.