Friday, March 8, 2019

Not Without My Daughter

Not Without My Daughter


Not Without My Daughter

आज काल  खुप बातम्या ऐकायला  येतात  काही लोक आपल्या नजर चुकीने म्हणा नाहीतर कोणाच्या तरी भुल थापेला बळी पडून, तर कधी  देशस्वरक्षणासाठी परक्या देशामध्ये अडकुन पडतात. अशी खुप लोकं दुसऱ्या देशामध्ये अडकली आहेत. आपल्या मायदेशी परत जाण्यासाठी खुप झटत आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबांमधील लोक आपला माणूस परत आपल्या घरी यावे म्हणुन ते सुद्धा अतोनात प्रयेत्न करत आहेत. कोणाची पत्नी,कोणाची बहीण तर कोणाचे मित्र.
नमस्कार मित्रहो आज जागतिक महिला दिन. या दिवसाचे अवचित साधुन आज मी एक स्त्रीच्या संघर्षाची कथा सांगणारे पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. या विश्वाने आज वर स्त्री चे किती तरी रूप पाहिले. कधी प्रियासी होऊन तिने त्या मुरली मनोहर कृष्णावर वेड्या सारखं प्रेम केलं. कधी पत्नी होऊन यमराजा काढुन आपल्या पतीचे प्राण मागितले. यासोबतच  कधी आई होऊन तिने शिवबाला हिंदवीस्वराज्याची संकल्पना दिली आणि हिंदवीस्वराज साकारले.
देवाने स्त्रीला दिलेले सर्वश्रष्ठ वरदान म्हणजे आई होणे होय. एक आई आपल्या लेकराची स्वतःच्या जीव पेक्षा जास्त काळजी घेते. आपल्या लेकरा शिवाय तिचे दुसरे विश्वच नसते. आपले लेकारु क्षणासाठी तिच्या नजरे पासुन दुर झाले तरी तिचे मन कासावीस होते.तिच्या लेकरावर कोणते संकट आले तर  ती ते स्वतःवर घेते. त्या संकटाशी दोन हात सुद्धा करते. त्याच आई समोर जेव्हा तिचं  लेकरु दूर करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तिची त्या विधात्याशीही लढण्याची तयारी असते. अशाच एका आईच्या संघर्षाची कथा सांगणारे पुस्तक. बेट्टी महमुदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या संकटाची कहाणी सांगणारी कादंबरी नॉट विदाऊट माय डॉटर (Not without My Daughter).
३०६ पानांची ही कादंबरी जेव्हा वाचायला सुरु केले तेव्हा ती हातातुन बाजुला ठेऊ वाटत नाही. क्षणा क्षणाला उत्कंठता वाढणारे कथानक आपल्याला कथेशी धरून ठेवते. यशस्वी होऊन अमेरिकेमध्येच स्थायिक होऊन. स्वतःला अमेरिकन बनवुन घेण्याच्या महत्त्वाकांक्षेने एक तरुण अमेरिकेमध्ये येतो आणि एका तरुणीच्या प्रेमामध्ये पडतो.ती सुद्धा त्या तरुणाच्या प्रेमात पडते आणि दोघे लग्न सुद्धा करतात. तो तरुण म्हणजे मुडी महमूदी आणि तरुणी म्हणजे बेट्टी महमुदी.सुखाचा संसार सुरू होत. त्याच्या संसाराच्या वेलीला एक कळी उमलती.त्यांची मुलगी माहतोब. आपल्या मायदेशी म्हणजेच इराणला आपल्या कुटुंबाची भेट घडवुन आणण्याच्या हेतूने मुडी आपल्या पत्नीला आणि मुलीला म्हणजेच बेट्टी आणि माहतोब यादोघींना घेऊन तो इराणला येतो. इथून कादंबरीची सुरवात होते. अमेरिके सारख्या स्वच्छ देशामध्ये रहाणारी बेट्टी इराणसारख्या गलिच्छ आणि घाणेरड्या देशामध्ये फक्त पंधरा दिवसासाठी म्हणुन जाते आणि तिथे कायमची अडकते. पुढे आपली फसवणुक झाले हे तिला समजते. आपल्या मायदेशी अमेरिकेला परत जाण्याची तिची धडपड सुरु होते. इराण सारख्या पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या देशामध्ये जेथे स्त्रीला पायाची भूल समजले जाते. अशा देशामध्ये ती एका क्रूर आणि जुलमी माणसाच्या हातचं बाहुलं बनून जाते.
आपल्या मायदेशी अमेरिकेला परतण्यासाठी ती अतोनात प्रयत्न करते. त्यामध्ये तिला काही लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतही करतात. तिला अमेरिकेला पळुन जाण्याची संधी मिळते. पण त्यामध्ये आपल्या मुलीला सोडुन एकटीने जावे अशी परिस्थिती निर्माण होते. त्या संधीला ती नाकारते. आणि अमेरिकेला जाईन तर आपल्या मुली सोबतच.असं ती आपल्या मनाशी ठरवते. आपली मुलगी आपल्या पासुन दूर जाऊन नये म्हणून ती दक्ष असते. इराणच्या घातक आणि आई मुलीची ताटातुट करणाऱ्या घाणेरड्या कायद्यांपासुन आपल्या मुलीचे आणि स्वतःचे रक्षण करते. पुस्तकामध्ये उल्लेख केल्या प्रमाणे इराणमध्ये एक कायदा आहे. जर  पतीच्या सहमती शिवाय पत्नीने मुल होऊ नये म्हणुन शास्त्रकिया (copper T Pin) केल्यास,पत्नीला मृत्युव दंडाची शिक्षा आहे. जर आपल्या पतीला हे समजले तर आपल्या मुली पासुन  कायमची दुर होईल म्हणुन बेट्टी महमूदी यांनी ती Copper T  Pin स्वतःकडली. ते वाचतेवेळी अंगावर काटा येतो.  
पुस्तक जसे शेवटाला येते. म्हणजे बेट्टीच्या परतीच्या म्हणजे अमेरिकेला जाण्याचा प्रवास सुरु होते. तेव्हा तर वाचकाला पुस्तक बाजुला ठेऊ वाटत नाही. क्षणा क्षणाला उत्कंठता वाढत जाते.
निडर आणि धाडसी आईच्या संघर्षाची कथा सांगणारे हे पुस्तक प्रत्येक स्त्री ने तर वाचलेच पाहिजेल. पण प्रत्येक पुरुषानी हे वाचलाच पाहिजेल त्याशिवाय एका आईची इच्छा शक्ती किती मोठी असते हे समजत नाही. मुळ इंग्रजी कादंबरीचे मराठी अनुवाद लेखीका लीना सोहनी यांनी सोप्या शब्दांमध्ये केले आहे.कादंबरीचे प्रकाशन मेहता पब्लिशिंगने केले आहे. प्रत्येक मराठी वाचकाच्या संग्रही हे पुस्तक असलेच पाहिजेल. 


श्रीजीवन तोंदले
www.pustakexpress.com

2 comments:

  1. खूप सुंदर परिचय श्रीजीवन... Mothers Day च्या दिवशी एका दर्जेदार पुस्तकाबद्दल माहिती मिळाली... नक्की घेऊन वाचेन

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की वाचा दादा तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल

      Delete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.