Sunday, January 13, 2019

तणकट



तणकट
-        राजन गवस
नमस्कार मित्रहो आज रविवार परत एक नवीन पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. एक अशा लेखकाचे पुस्तक ज्याच्या प्रत्येक पुस्तकास विविध पुरस्कार मिळालेले आहेत,कोल्हापुर शिवाजी विद्यापीठातुन एम.ए.,एम एड पर्यंत शिक्षण पूर्ण केले.भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करून ते प्रभावीरीत्या लोकांसमोर मांडणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य मानले जाते.त्यांच्या अशाच प्रभावी लेखणीतुन अवतरलेली साहित्य अकादमीपुरस्कार प्राप्त कादंबरी म्हणजे राजन गवस लिखित तणकट.
कादंबरी वाचायला सुरवात केली आणि ती हातातुन बाजूला ठेवावीच वाटत नाही.एखाद पुस्तक वाचायला सुरवात केल आणि कधी एकदा ते पुर्ण करतो असच होत. कारण कथेच्या शेवटी काय आहे याची उत्सुकता रहाते. कथा जेव्हा शेवटाकडे येते तेव्हा ती कधी संपुच नये अस वाटते. तणकट या कादंबरीविषयी माझी भावना अशीच आहे.कादंबरी वाचायला सुरवात केली आणि ती बाजूला ठेऊ वाटत नाही.कादंबरीचे प्रकाशन साकेत प्रकाशनने केले आहे. कादंबरीचे मुखपृष्ठ विकास जोशी यांनी साकारले आहे.
आता कादंबरी विषयी सांगतो, लेखक राजन गवस यांची समाजामधील प्रत्येक घटकांवर आणि प्रत्येक घटनांवर एक वेगळीच नजर असते. त्याच प्रभावी नजरेतुन ते प्रत्येक गोष्ट,घटना,विषय आपल्या कथेतून मांडतात. तणकट ही कादंबरी सुद्दा लेखकाने तितक्याच प्रभावीपणे आपल्या समोर मांडली आहे.
तणकट या कादंबरीमधुन गावा-गावा मधील जाती-पातीच राजकारण अगदी गावाकडच्या भाषेमध्ये मांडले आहे. कादंबरीचे कथानक साधारण नव्वदच्या दशकातील आहे. एक अस दशक ज्यावेळी समाजातील एका वंचित घटकाच्या हिताचे नवनवीन कायदे तयार झाले. हे कायदे काय आहेत कोणासाठी आणि कशासाठी आहेत हे त्या वंचित घटकाला माहित नव्हते.याच गोष्टीचा फायदा काही लोकांनी आणि खुद्द काही त्याच वंचित घटकातील लोकांनी घेतला. याच कायद्यांचा वापर करून जाती जाती मध्ये तिढे निर्माण केले. कथेचा खलनायक शेंडबाळे त्याच वंचित घटकातील लोकांना हाताशी धरून गाव मध्ये आपलं राजकारण खेळात रहातो. कथेचा नायक कबीर हा त्याच घटकातील एक. आपल्या अवती-भोवती जे राजकारण सुरु आहे ते चुकीचं आहे. हे माहिती असुन सुद्धा त्याला काहीच करता येत नसते. मग शेवटी अशी काही घटना घडते त्या घटनेने सर्व गाव हदरून जाते. त्या सोबत वाचणारा वाचक सुद्धा हदरून जातो. कादंबरीमध्ये काही अशा घटनांचे वर्णन केले आहे ते वाचले की आज आपल्या जु-बाजुला जे जातीपातीचे राजकारण सुरु आहे. त्याची विदारकता समजते.
सध्या समाजामध्ये अजुन हि जातीपातीचे राजकारण सुरु आहे. कुठे छुप्या पद्धतीने तर कुठे उघड पणे. मिळालेल्या सुविधांचा कोण योग्य वापर करत आहे. तर कोणी त्याच सुविधांचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून समाजामध्ये तिढे निर्माण करत आहेत.सामाज्यामध्ये चाललेल्या या घटना पाहिले की मन सुन्न होऊन जाते.

मला असे वाटते की देवाने फक्त माणुस घडवला आणि माणसाने हे जातीपातीचे बंधने घडवली.याच जातीपातीच्या थोतांडाने माणसांच्या मध्ये द्वेष निर्माण झाले. जेव्हा ह्या जातीपातीच्या भिंती कायमच्या नष्ट होतील तेव्हाच माणुस माणसाला माणसा सारखी वागणुक देईल. याच जातीच्या भिती कायमच्या दुर करण्याचा आणि माणुसकी हाच खरा धर्म,जात,पंत आहे. हे विचार लेखक राजन गवस यांनी या कादंबरीमधुन मांडले आहेत. प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक जरूर असलेच पाहिजेल.


श्रीजीवन तोंदले.

3 comments:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.