Sunday, January 20, 2019

Gujarat Files Reviews Book by Rana Ayyub




गुजरात फाईल्स-कृष्णकृत्याचा रहस्यभेद
राणा अय्युब



ह्या जगात अशी काही माणसं आहेत जी सत्याच्या शोधात स्वतःला पुर्णपणे झोकुन देतात. आपले इच्छित साध्य होत नाही तोवर ते धडपडत असतात. मागे न फिरता, मग त्यांच्या वाटेमध्ये कितीही अडथळे आले तरीही प्रत्येक परिस्थितीला तोंड देत पुढे जात रहातात. कारण त्यांना माहिती असते मागे फिरणे सोपे असते पण पुढे जाणे तितकेच गरजेचे आहे. मग ती व्यक्ती जर एक पत्रकार असेल तर...?खऱ्या आणि सत्य गोष्टी लोकांसमोर आणणे हे त्याचे परम कर्तव्य असते. उगाचच पत्रकारितेला या लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते नाही. ५ जानेवारीला पत्रकारदिन झाला.बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, खाडिलकर, महाजनी, आचार्य अत्रे यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची ही आता अर्नब गोस्वामी,राजदीप सरदेसाई,प्रसन्न जोशी,बरखा दत्ता,गौरी लंकेस,अंजना ओम कश्यप,आणि ह्या मध्ये एक नाव आवर्जुन घ्यावे ते म्हणजे राणा अय्युब. या आणि अश्या खुप पत्रकारांनी ही परंपरा अविरतपणे पुढे घेऊन  जात आहेत. 
पत्रकार हा निर्भीड असतो. कोणाच्या दबावाखाली न येता सत्याची कास धरून प्रत्येक घटनेमागचे सत्य लोकांसमोर आणतो.अशेच काहीसे काम पत्रकार राणा अय्युब यांनी केले आहे. राणा अय्युब ह्या एक धाडसी पत्रकार आहेतच शिवाय घटनेच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्या मागचे खरे सत्य पुढे आणणे हे काम त्यांनी खुप धाडसाने केले आहे आणि करत आहेत. राणा अय्युब ह्या स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार,लेखिका आणि तेहलकाच्या माझी संपादिका आहेत.
मी याठिकाणी पत्रकार राणा अय्युब यांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्या पहिल्या पुस्तक संबंधी मी बोलत आहे. आणि ते पुस्तक म्हणजे गुजरात फाईल्स-कृष्णकृत्याचा रहस्यभेद. हे पुस्तक शोध पत्रकारितेचा एक आदर्श नमुना म्हणावे लागेल. या पुस्तकामधुन एक गोष्ट समजून येती. ती म्हणजे हातात सत्ता असणाऱ्या लोकांनी त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडुन आपलं इच्छित साध्य करून घेतले.कधी दबावतंत्र वापरले तर कधी सत्तेचा वापर केला. २००२ ते २००६ च्या दरम्यानच्या गुजरात मधील दंगली आणि त्या दरम्यानच्या खोट्या चकमकीच्या मागचे सत्य राणा अय्युब यांनी या पुस्तकामधुन मांडला आहे. ११ प्रकारणांमधुन हा सर्व रहस्य भेद या पुस्तकामधुन सुमारे २०० पानांमध्ये मांडला आहे. गुजरात मध्ये ज्या खोट्या चकमकी झाल्या. त्यांचा पडदाफाश करण्यासाठी राणा अय्युब यांनी मैथिली त्यागी या नावाने गुजरातमध्ये वास्तव्य केले होते. हे काम पुर्णत्वा कडे घेऊन जाताना राणा अय्युब यांना खुप संकटांना सामोरे जावे लागले. कधी अंधाऱ्या बंगल्यामध्ये रहावे लागले. जेथे एका सापाचे वास्तव्य होते. तर कधी एका महिला पोलिस माधिकाऱ्याला भेटण्यासाठी दुर निर्जन ठिकाणी एकटीला जावे लागले. ह्या सर्व रोमहर्षक प्रवासामध्ये राणा अय्युब यांना काही चांगल्या व्यक्ती हि भेटल्या. ज्यांनी त्यांना वेळोवेळी मदत केली.सर्व गोष्टींचा सत्य शोध घेतल्या नंतर राणा अय्युब यांच्या पदरी उपेक्षाच आली. त्यांनी बनवलेला रिपोर्ट पब्लिश होणार नाही असे त्यांना सांगण्यात आले. कारण ज्या व्यक्तीच्या विरोधात त्यांनी पुरावे गोळा केले. ती व्यक्ती उद्याच्या भारत देशाची भावी पंतप्रधान होती.(आहे)
 राणा अय्युब यांनी जे सत्य आपल्या समोर मांडले हे कितीपत खरे आहे हे माहिती नाही. कारण हि नाण्याची दुसरी बाजु आहे. नाण्याची एक बाजु आपण या आधीच वर्तमानपत्रातुन वाचली आहे. जसजसे आपण हे पुस्तक वाचुन पुर्णत्वाकडे जातो. तसे खरे सत्य काय हे आपल्या समोर येते. राणा अय्युब यांना त्यांनी बनवलेला रिपोर्ट पब्लिश होणार नाही हे सांगितले गेले. तेव्हा त्यांनी हे पुस्तक पब्लिश करण्याचे ठरवले. आणि त्यामध्ये त्यांना खुप लोकांनी मदत केली.
ज्या लोकांना सत्य जाणुन घ्यायची आवड असते. त्यासाठी बंड हि करावा लागला तरी त्याची तयारी असते अशा लोकांसाठी हे पुस्तक आहे. हे पुस्तक जेव्हा आपण वाचाल तेव्हा काही व्यक्तीची खरी ओळख आपल्याला नव्याने होईल. प्रत्येकाने आपल्या संग्रही हे बंडखोर पुस्तक जरूर ठेवावे. प्रत्येकानी जरूर वाचावे असे हे पुस्तक पत्रकार राणा अय्युब लिखित गुजरात फाईल्स-कृष्णकृत्याचा रहस्यभेद.

-        

           श्रीजीवन तोंदले

9 comments:

  1. वाचलंय पुस्तक आवडले नाही फारसे फारच भडक वाटले

    ReplyDelete
  2. फारच भडक वाचलंय पण आवडलं नाही
    Review उत्तम balanced लिहिलायस

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद यशश्री तुमचे मार्गदर्शन माझ्यासाठी मोलाचे आहे

      Delete
  3. भारतातील प्रत्येक सुज्ञ नागरिकाने मनूवादी प्रवृत्ती विरूद्धच्या लढाईत एक सैनिक झाले पाहिजे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मी केलेले इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा

      Delete
  4. Very Good extract of the content written! Keep it up !

    ReplyDelete
  5. गोधरा में ट्रेन में कैसे जलाए गए थे बेचारे यात्री इसके बारे में भी कुछ जाना।या केवल पाकिस्तानी , कांग्रेसी प्रोपोगंडा ओर काम किया?

    ReplyDelete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.