काळीजोगीण
लेखक
- नारायण धारप
काही लोक अशी असतात ज्यांना सर्व
गोष्टी झटपट लवकर हव्या असतात.समाजामध्ये अशा लोकांची संख्या जास्त आहे.ज्यांना
कष्ट करणे हे नको वाटते.झटपट यश, झटपट श्रीमंती मिळवण्यासाठी काहीही
उपाय करण्याची त्यांची तयारी असते. मग ते अघोरी उपाय असले तरी, त्यासाठी कोणतीही किंमत चुकवावी लागली
तरी.सर्व काही झटपट मिळवण्याच्या हाव्यास पोटी आपल्या सोबत आपल्या लोकांचीही वाताहत होत आहे हे
त्यांना समजत नसत.
नमस्कार मित्रहो आज मी तुम्हाला अशाच
एका पुस्तक विषयी सांगणार आहे. रहस्यमय आणि गूढतेने खच्चून भरलेलं पुस्तक. आता
रहस्यमय आणि गूढ लेखन म्हंटल कि त्यांच नाव अव्वल स्थानी येते. वाचकांना
आपल्या लेखणी द्वारे शेवट पर्यंत खेळवत ठेवणारे
लेखक म्हणजे आदरणीय नारायण धारप(सर).त्यांच्या रहस्यमय आणि गूढ
कादंबरी मधील एक कादंबरी मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. ती म्हणजे काळीजोगीण.
कादंबरी बघायला गेलं तर छोटी वाटते.
फक्त ९१ पानांची. पण जेव्हा आपण ती वाचायला सुरवात करतो तेव्हा आपण त्या मध्ये
हरवुन जातो. कादंबरी हातातुन बाजूला ठेवता
येत नाही.कादंबरीची सुरवातच वाचला आपल्या जवळ ओढुन घेणारी आहे. आपल्या श्रीमंत
बहिणीच्या आणि तिच्या यशस्वी पतीची बरोबरी करण्यासाठी. त्यांच्या पुढे जाण्यासाठी काहीही
करण्याची तयारी अच्युतची असते. त्यासाठी तो खुप प्रयत्न करत असतो. त्याच दरम्यान
त्याच्या ऑफिसमधील एक मित्र काळ्याजोगिणीची कथा सांगतो. काळी जोगीण आपल्याला हवं
ते देती. मग ती श्रीमंती असो वा आणि काहीही. अच्युत हिच गोष्ट मनात धरतो आणि या
काळ्याजोगिणीच्या शोधात बाहेर पडतो. काळ्याजोगिणीच्या भेटीमध्ये अशी काही घटना
घडते ज्यांनी अच्युत एका अनामिक विश्वामध्ये,एक अनामिक न सुटणाऱ्या भूलभुलैया मध्ये अडकुन पडतो. त्याच्या मधून
बाहेर पढणे जवळ जवळ अशक्यच. नलिनी अच्युतची पत्नी त्याला या मधुन बाहेर
काढण्यासाठी त्या अनामिक शक्तीशी दोन हात करते. यामध्ये तिला लोकांची साथ सुद्धा मिळते. पण या लढ्यामध्ये नलिनी
अश्या काही प्रकारे अडकते त्याने वाचणाऱ्याचे मन सुन्न होऊन जाते. आणि वाचणाऱ्याला
सुद्धा वाटतं आता सगळं संपलं. पण तो शेवट नसतो खरी गोष्ट
अजुन नक्की बाक्की असते.......
लेखकानी कादंबरी मध्ये काही गोष्टी उदाहरणासह
मांडल्या आहेत. (उदा. आरशावर आलेल्या तेलकट तवंगाचे,समुद्राच्या लाटाचे.) चित्तथरारक,रोमहर्षक,अकल्पित,गूढतेची एखाद्या भयपटाला शोभावी अशी हि गोष्ट. लेखक नारायण धारप
यांनी इतक्या उत्तम प्रकारे मांडली आहे की कादंबरी वाचकाला तिच्याकडे ओढून धरते.
हीच तर लेखन नारायण धारप यांच्या लेखनाची
खासियत आहे जी वाचकाला अक्षरशः वेड लावते.भय,गुढ,रोमहर्षक अशा विषयांच्या वाचनाची आवड
ठेवणाऱ्यांसाठी प्रत्येक वाचकाच्या संग्रही हे पुस्तक असायला हवेच. प्रत्येक
वाचकाने जरूर वाचावी अशी हि कादंबरी लेखन नारायण धारप लिखित काळीजोगीण.
मित्राण या कादंबरी निमित्य आज एक गोष्ट तुमच्या समोर मांडावीशी
वाटते. झटपट यश झटपट श्रीमंती मिळवण्यासाठी अजुनही काही लोक अघोरी उपाय करत आहेत.
खोट्या अंधश्रद्धेमुळे किती तरी कुटूंब बरबाद झालीत. कितींची
वाताहत झाली. आणि किती तरी लोकांनी अंधश्रद्धा हा समाजाला लागलेला आजार
मिटवण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्या व्यक्तींमध्ये मी एका व्यक्तीच नाव
पुर्ण अभिमानाने घेत आहे. ती व्यक्ती म्हणजे आदरणीय
डॉ. नरेंद्र दाभोलकर (सर). खोट्या अंध श्रद्धाचा समाजाला लागलेला आजार मिटवण्यासाठी डॉक्टरांनी
आपले आयुष्य खर्ची केले. त्यांनी चालवलेला हा लढा अजुनही अविरत पणे सुरू आहे. त्या लढ्याला मदत करणारीही कादंबरी आहे. जी आपल्याला खोट्या अघोरी अंध श्रद्धेच खरं रुप दाखवते. त्या
पासुन सावध रहाण्याचा इशारा देते.
- श्रीजीवन तोंदले