Sunday, October 21, 2018

नितळ,निपक्ष प्रेम करायला शिकवणारी कादंबरी.


                             


                            



महाश्वेता

 

                     लेखिका -सुधा मूर्ती

 

कॉम्पुटर सायन्समध्ये एम.टेक केलेल्या आणि पुण्यातील टेल्को कंपनीमध्ये पहिल्या स्री अभियंता म्हणुन निवडल्या गेलेल्या अत्यंत हुशार आणि मनाने, विचाराने आणि रहाणीमानाने ही अत्यंत साध्या असणाऱ्या, प्रत्येक तरुण-तरुणीच्या प्रेरणा स्थानी असणाऱ्या अशा आदरणीय सुधा मूर्ती यांच्या लिखाणाने समृद्ध झालेली कादंबरी 'महाश्वेता'.

या कादंबरीचा संदर्भ मला त्यांच्या एक पुस्तका मधुन म्हणजेच वाईज अँड अदरवाईज या पुस्तकामधील एका कथेतुन मिळाला. त्या कथे मध्ये महाश्वेता या कादंबरीचा उल्लेख मिळाला. मग मनाशी ठरवलं आणि लगेचच ही कादंबरी वाचायला घेतली.

१५० पानांचे हे पुस्तक इतकी जबरदस्त आहे, की वाचून पूर्ण केल्या शिवाय हातातून खाली ठेवता येत नाही. पुस्तकाचे प्रत्येक पान आपल्याला त्याच्या सोबत बांधून ठेवते. कादंबरीची सुरवात आनंद आणि अनुपमा यांच्या प्रेमाने होते. अनुपमा अत्यंत सुंदर पण एका शाळा मास्तरची मुलगी. दुसरीकडे आनंद अत्यंत हुशार घरंदाज गर्भश्रीमंत डॉक्टर. दोघांचं लग्न होणे अत्यतं कठीण पण सर्वांचा विरोध असुन सुद्धा त्यांचं लग्न होते. पुढे लग्नानंतर काही महिन्यात एक दुर्दैवी घटना घडते. अंगावर कोड उठणे म्हणजे काही मोठा गुन्हा नाही, आणि त्यामुळे समाजने बहिष्कृत करणे ही त्या समाजाची अंत्यंत लाजिरवाणी गोष्ट. अनुपमाच्या सुखी जीवनात ते वादळ येत त्यात ती बिचारी होरपळून जाते. त्यामुळे तिचे सासर आणि माहेरचे नाते तुटून जाते. पण स्वतःला सावरून ती आपल स्वतंत्र विश्व निर्माण करते. पण ते विश्व निर्माण करते वेळी अनुपमाला काही संकटांशी दोन हात करावे लागतात. 

अनुपमा आणि आनंद यांच्या व्यतिरिक्त वसंत, सत्या, डॉली आणि इतर काही व्यक्तिरेखा  या कथेमध्ये येतात.  सुप्रसिद्ध संस्कृत नाटककार व्यास यांच्या नाटकावर आधारित या कादंबरीचा विषय आहे. कादंबरी वाचते वेळी आपण कधी कधी स्वतःला आनंदच्या जागी बघतो  आणि विचार करतो की आपण आनंदच्या जागी असतो तर हेच केले असते का...? तर कधी आपण स्वतःला वसंतच्या जागी बघतो आणि विचार करतो की आपण अनुपमाचा स्वीकार केला असता...?

 कथेच्या शेवटी नाटकातील एक संवाद दिला आहे तो वाचताना आपण स्वतःच अनुपमा आहोत असा भास होतो. स्वतःला असंख्य प्रश्न करणारी आणि त्याची उत्तरे शोधायला लावणारे असे हे पुस्तक लेखिका  सुधा मूर्ती लिखित महाश्वेता.

 कादंबरीचे मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केले आहे. मेहता पब्लिकेशनने कादंबरीचे प्रकाशन केले आहे. वाचनीय आणि विचार करायला भाग पडणारी कथा. त्यासोबतच नितळ, निपक्ष प्रेम करायला शिकवणारी कादंबरी लेखिका सुधा मूर्ती लिखित महाश्वेता. 

6 comments:

  1. Replies
    1. Thanks for your comment. for more book review please follow us on Instagram
      ID- shri_pustakexpress

      Delete
  2. Replies
    1. Thanks for your comment. for more book review please follow us on Instagram
      ID- shri_pustakexpress

      Delete
  3. Replies
    1. Thanks for your comment. for more book review please follow us on Instagram
      ID- shri_pustakexpress

      Delete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.